Search
  • alpayuexpress

शिवसेना आमदाराची गुंड गिरी कंत्राटदाराला सांडपाणी आणि कचऱ्याचा अभिषेकमुंबई मधून महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज धोत्रे यांची बातमी.


शिवसेना आमदाराची गुंड गिरी

कंत्राटदाराला सांडपाणी आणि कचऱ्याचा अभिषेक


गेल्या काही दिवसांपासून मान्सून मुंबई दाखाल झाला आहे. पहिल्या पावसातच मुंबई च्या महापौरांनी केलेलं नाले सफाई चे दावे फोल ठरले. विभागा विभागात नाले दुथडी भरून रस्त्यावर वाहत होते. नागरिकांना ह्याचा त्रास तर होतच आहे.

सदर चित्रफित मध्ये आपण बघू शकता की कश्या प्रकारे नाल्याच्या बाहेर रस्त्यावर पाणी वाहत आहे. आणि तेथील स्थानिक शिवसेना आमदार एका व्यक्तीला त्या सांडपाण्यात बसवून त्याला कचऱ्याचा अभिषेक करत आहेत.

सदर घटना ही कुर्ला पश्चिम येथील आहे. तिथल्या नाले सफाई चे कंत्राट दिलेल्या शासकीय कंत्राट दाराला स्थानिक आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की करत त्या सांडपाण्यात बसवलं आणि सफाई कामगारांना त्या कंत्राट दारावर जमा झालेला कचरा टाकण्यास सांगितले..आणि तसेच त्या घाण पाण्यात बसवून ठेवले.

प्रश्न असा आहे की नागरिकांची आमदारांना इतकी काळजी आहे तर मग पावसाळ्या आधी नाले सफाई झाली की नाही हे तपासून घेण्याचे काम तुमचं होत की नाही. मुंबईच्या महापौरांनी निवडलेला हा कंत्रादार आहे मग त्याच्या कडून कामाचा फॉलो उप घेणे हे स्थानिक प्रशासकीय प्रतिनिधींचे आहे. ते न करता अशी गुंडागर्दी करत एखाद्यास अमानवीय सजा देणे कित पत योग्य.

शासनाने याची दखल घेतली पाहिजे. या गोष्टी वर कारवाही झालीच पाहिजे.

132 views0 comments