Search
  • alpayuexpress

माथेरान मध्ये साहसी खेळास परवानगी द्यावी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांना निवेदन


माथेरान मधून पत्रकार भूषण सातपुते यांची बातमी

माथेरान मध्ये साहसी खेळास परवानगी द्यावी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांना निवेदन
माथेरान - भारतीय जनता पक्ष च्या वतीने माथेरान मध्ये नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मा वाटप आणि आधार कार्ड शिबीर अश्या प्रकारचा उपक्रम घेतला गेला. सदर कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष जिल्हा प्रमुख तसेच पनवेल विभागाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विभागाचे आमदार महेशशेठ बालदी हे प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते.

माथेरान चे उपनगर अध्यक्ष चौधरी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांना एक निवेदन पत्र लिहले. ज्या मध्ये माथेरान मध्ये साहसी खेळास केंद्राची परवानगी मंजूर करून घ्यावी असे नमूद होते . प्रथम आकाश चौधरी यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेशशेठ बालदी ह्यांच्या समोर सदर विषय मांडला आणि त्याचे माथेरान ला कितपत फायदे होतील हे पटवून दिले. आणि पुढे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेशशेठ बालदी यांनी दिल्ली ला केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दिले.

या निवेदन मधले काही ठळक मुद्दे आहेत त्या वर थोडी नजर टाकूया.

माथेरान हे पर्यावरण सवेंदनशील क्षेत्र म्हणून भारतीय पर्यावरण, जंगल आणि हवामान मंत्रालयाने घोषित केले आहे. संपूर्ण आशिया मधलं हे पहिल असं गिरिस्थान आहे जे स्वयंचलित वाहने रहित आहे. त्या मुळे इथले संपूर्ण कुटुंब हे १०० टक्के पर्यटन व्यवसायावर आपले जीवन जगत आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा उद्योग, शेती किंवा वाहन नाही. संपूर्ण देशभरातून माथेरान मध्ये अंदाजे वर्षाला १० लाख पर्यटक येतात. म्हणून माथेरान गिरिस्थानात पर्यटकांसाठी साहसी खेळ असं वेगळं एक नवीन उपक्रम सुरु करावा. जेणे करून जास्तीत जास्त पर्यटक येथे आकर्षित होतील आणि फक्त पर्यटक च नाही तर येथील स्थानिक तरुण मुलांना नवीन रोजगार सुद्धा उपलब्ध होईल.

अश्या प्रकारचे निवेदन दोन्ही आमदारांनी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची दिल्लीत भेट घेऊन दिले. तसेच या विषयवार चर्चा हि केली.

संबंधित खात्याशी बोलून माहिती काढून निर्णय घेऊ असे जी. किशन रेड्डी यांनी आश्वासन दिले.

या वेळेस उपस्थिती नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम,चंद्रकांत जाधव, नगरसेविका प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे , सोनम दाभेकर, रुपाली आखाडे तसेच माथेरान शहर अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष सुभाष भोसले, शैलेंद्र दळवी, सचिव संजय भोसले तसेच महिला अध्यक्षा संध्या शेलार आणि प्रदीप घावरे, कुलदीप जाधव, राजेश चौधरी, प्रवीण सकपाळ, किरण चौधरी, रजनी कदम आणि अरविंद शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.18 views0 comments