Search
  • alpayuexpress

मनसे च्या मागणीला यश आता गॅस सिलेंडर वजन करूनच मिळणार.माथेरान मधून पत्रकार भूषण सातपुते यांची बातमी मनसे च्या मागणीला यश आता गॅस सिलेंडर वजन करूनच मिळणार. काही दिवसांपूर्वी आपण माथेरान मधली घरगुती गॅस सिलेंडर बाबत बातमी दाखवली होती.. गॅस सिलेंडर उपभोक्ता यांची तक्रार होती की सिलेंडर मधला गॅस हा कमी भरला जातो. पूर्वी एक महिना चालणारा गॅस आता पंधरा दिवस ही चालेना..सदर विषयासंबंधी महारष्ट्र नवनिर्माण सेना शहर माथेरान च्या वतीने नेरल भारत गॅस सर्विस यांना निवेदन देण्यात आले होते, घरगुती गॅस म्हणजे जीवनावश्यक वस्तू मधला एक भागच आणि त्याचे भाव दर हा वाढतच चालला आहे आणि जिथे लोकांना एक गॅस सिलेंडर एका महिन्याला पुरेसा होता तिथे आता दोन वापरावे लागत आहेत याचे गांभीर्य लक्षात घेऊन माथेरान मनसेच्या वतीने गॅस वितरण कक्षात वजन काटा लावण्यात यावा ही मागणी केलि होती आणि ती आज दिनांक एकोणीस ऑगस्ट ला पुर्ण झाली आहे. मनसे च्या सतत च्या केलेल्या पाठपुराव्याने आणि आपण दाखवलेल्या बातमीने हे शक्य झाले आहे. आता गॅस सिलेंडर विकत घेताना तो वजन करूनच दिला जाईल आणि ग्राहकाने तो वजन करूनच घ्यावा अशी आग्रहाची विनंती मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.44 views0 comments