- alpayuexpress
नवी मुंबईत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

नवी मुंबईत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
जून शुक्रवार 5-6-2020
( अल्पायु एक्सप्रेस न्यूज )
नवी मुंबई - रबाळे तळवली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे यांची आज दिवसाढवळ्या रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी गोळ्या झाडल्या अशी महिती मिळाली. तायडे यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बांधकाम साईटवर लागणाऱ्या साहित्यांचा सप्लाय करण्याचा तायडे यांचा व्यवसाय आहे. घणसोली, रबाळे आदी ठिकाणी सुरू असलेल्या इमारती, टॉवरच्या बांधकामासाठी ते सप्लायर्स म्हणून व्यवसाय करत होते. या व्यावसायिक वादातून किंवा पूर्ववैमन्स्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही क्षणात मारेकरी फरार झाले.
रबाले पोलिसांत गुन्हा दाखल.
सदर घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील आणि त्यांच्या युनिटच्या पोलिस निरीक्षकांनी पाहणी केली.
यावेळी पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा गेल्या महिन्यापासून आजपर्यंतचा सीडीआर फोनची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्याठिकाणी जाऊन चौकशी केली जात आहे.