Search
  • alpayuexpress

तुमच्या लढाईत मी तुमच्या सोबत; व्यापारी महासंघाला निलेश राणे यांनी दिली ग्वाही।


संवादाता:— मनोज धोत्रे।


तुमच्या लढाईत मी तुमच्या सोबत; व्यापारी महासंघाला निलेश राणे यांनी दिली ग्वाही



*रत्नागिरी । प्रतिनिधी*

लॉकडाऊनच्या जाचक निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या रत्नागिरीतील व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज भाजपा प्रदेश माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आपण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही निलेश राणे यांनी व्यापाऱ्यांना दिली.


व्यापारी वर्ग सध्या अनेक अडचणीतून जात आहे.त्यात राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर करून गोंधळाची स्थिती निर्माण केली. यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत त्यांनी मंत्री, प्रशासन यांच्याकडे स्वतःची बाजू मांडली.परंतु या निर्बंधाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. तर व्यापारी महासंघाने केलेल्या निषेधाचे फलक सुद्धा नागराध्यक्षांकडून हटविण्यात आले. आपल्या अडचणी आणि वस्तुस्थिती शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांच्याकडे मांडल्या.।

त्यावेळी जर सरकारने कडक लॉक डाऊन जाहीर केला तर ठीक नाहीतर अर्धवट लॉक डाऊन जाहीर केल्यास त्याचा विरोध करा, भले केसेस झाल्या तरी चालतील, न्यायालयीन लढाईत माझे वकील देऊन मी तुमच्यामागे खंबीरपणे उभा राहीन असे वचन माजी खासदार निलेश राणे यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.


माजी खासदार निलेश राणे यांनी व्यापारी महासंघाला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीला बळ मिळाले आहे. या भेटीच्यावेळी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष उदय पेठे, तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहर अध्यक्ष गणेश भिंगार्डे, उपाध्यक्ष राजकुमार जैन, किशोर मोरे, अमोल डोंगरे, निलेश जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

1 view0 comments