top of page
Search
  • alpayuexpress

जोगेश्वरी पूर्व येथे राज ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजनमुंबई मधून महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज धोत्रे यांची बातमी.


जोगेश्वरी पूर्व येथे राज ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन


महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा त्रेपंनावा वाढदिवस चौदा जून ला झाला. दरवर्षी कार्यकर्ते दादर येथे त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे उपस्थित राहून जल्लोषात राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करतात परंतु सध्याची कोरोना ची परिस्थिती असल्यामुळे राज ठाकरे यांनी दोन दिवस अगोदर पत्रक काढून सर्वांना कृष्णकुंज येथे न येता आप आपल्या विभागात लोक उपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्याचे आदेश दिले.

त्याच अनुषंगाने जोगेश्वरी पूर्व येथील महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना कार्याध्यक्ष तसेच जय जवान गोविंदा पथक चे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री संदीप ढवळे सर यांनी रक्तदान शिबिर चे आयोजन केले. राज ठाकरे यांचा त्रेपंनावा वाढदिवस म्हणून संदीप सर यांनी त्रेपनं रक्ताच्या युनिट संकलन करण्याचा निर्धार केला होता आणि ते केले.

ह्या रक्तदान शिबिरास मनसे च्या विवीध अस्थापनेतील नेत्यांनी हजेरी लावली, मनसे माथाडी कामगार सेना अध्यक्ष श्री अरविंद गावडे आणि पदाधिकारी तसेच स्थानिक विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले आणि विद्यार्थी सेने चे विभाग अध्यक्ष संतोष लोखंडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थिती दर्शिवली.

मनसे महिला सेनेच्या सौ. संध्या मोरे, सौ प्रणिता बोभाटे, सौ सायली ढवळे, सौ धुरी आणि सौ मीनाक्षी सावंत यांनी त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांसह उपस्थिती दर्शीवली..

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी लावली. कार्यक्रमात संबोधताना अविनाश जाधव काय म्हणाले या पाहूया..

22 views0 comments
bottom of page